कधी कधी वाटते
अशी द्यावी आर्त साद तुला
की तोडून सारे पाश तू
फिरून यावेस मागे
कधी कधी वाटते
बागेतल्या त्या बाकावरती
पुन्हा घालावी तुला मागणी
दाखवावे ह्रदय सोलुनी
अन भाव मनीचे बोलुनी
कधी कधी वाटते
अशीच घडावी ती सहल पुन्हा एकदा
गाण्यातल्या त्या गमती - जमती
नजरांच्या त्या गाठी भेटी
कधी कधी वाटते
दाटून यावे तुज्या आठवणींचे आभाळ
अन चिम्ब चिम्ब भिजावे
खारया पावसात
--- शरद ( "पारिजातक ", २६ जानेवारी 2010 )
Friday, March 26, 2010
Subscribe to:
Posts (Atom)